महागाईच्या विरोधात उद्या राष्ट्रवादीचा गोंदिया बंद

0
8
गोंदिया,दि.09- पेट्रोल,डिझेल, गॅसची वाढती किमंत व महागाईला घेवून विरोध प्रदर्शन करण्यासाठी धेशातील विरोधी पक्षांनी एकत्रित येत उद्या १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गोंदिया बंद आवाहन करण्यात आले आहे. तेव्हबा सर्व शाळा,महाविद्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठान,ऑटो चालक, ट्रक चालक व अन्य सर्व व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी गोंदिया बंदमध्ये सहभागी आवाहन करण्यात आले आहे.  ८ सप्टेंबर रोजी खासदार प्रफुल पटेल यांच्या जनसंर्पक कार्यालयात  माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक घेवून बंद यशस्वी करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
देशात पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर वस्तूंची दर दरदिवशी वाढत आहेत. त्यामान्य नागरिक व शेतकNयांना त्रास होत आहे. आज जीवनावश्यक वस्तूंचे दर ऐवढे वाढले आहेत की, त्यामुळे महागाई मोङ्ग्या प्रमाणात वाढली आहे. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात महागाईचा विरोध करण्यात आला असून शासनाने विविध कराचे दर कमी करून पेट्रोल व डिझेल व इतर वस्तूंची महागाई कमी करम्याची मागण्यात आली होती. मात्र, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार½र याचा काही परिणाम झालेला नाही. तेव्हा महागाईच्या विरोध करण्यासाङ्गी गोंदिया बंदचे आयोजन करण्यात आले असून सदर बंद यशस्वी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.