जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या समस्या लवकरच निकाली

0
11
जि.प.सीईओ राजा दयानिधी यांच्या कॉस्ट्राईब संघटनेला आश्वासन
गोंदिया,दि.09-  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे शाखा गोंदिया यांची जिल्हा परिषदेच्या समस्यांबाबद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.राजा. दयानिधी यांच्या दालनात सभा संपन्न झाली. मागील बर्याच वर्षापासून जि.प. कर्मचार्यांच्या समस्या निकाली काढण्यात आलेल्या नव्हत्या. त्याकरीता कॉस्ट्राईब संघटनेच्यावतीने एम.राजा. दयानिधी यांना निवेदन देवून  सभा लावण्याकरीता विनंती करण्यात आली होती. त्यानुसार संघटनेच्या व जि.प.कर्मचार्यांच्या समस्यांची गंभीर दखल घेत सीईओंनी सभा आयोजित केली होती. सभेत जिल्हा परिषद कर्मचाNयांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन एम.राजा दयानिधी यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांना दिले.
सभेत जि.प. कर्र्मचार्यांच्या समस्या संवर्गनिहाय  रिक्त पदे, भरलेली पदे, पदोन्नतीने भरावयाची पदे, सरळ सेवेने भरलेली पदजे इ.माहिती संघटनेला पुरविणे, गोंदिया जिल्हा परिषदेत मागासवर्गीयांच्या रिक्त पदाचा अनुशेष भरणे, अनुकंपा तत्वावर  रिक्त पदाच्या २० टक्के अनुकंपा पदे भरण्याची कार्यवाही करणे, प्रलंबित उपलब्ध पदोन्नती  व सर्व विभागातील प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, प्रयोगशाळा सहाय्यक याबबाद निर्णय घेणे, प्रणाली जनबंधू अनुवंâपा माध्यमिक शिक्षण विभाग सुनावणी लावणे, विनोद बन्सोड यांच्या पदोन्नतीसाङ्गी सुनावणी लावण्याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात यावे, रिक्त पदे भरताना  अनुवंâपा, प्रकल्पग्रस्त, अपंग, अंशकालीन यांना पदे भरताना शासन निर्णयानुसार प्राधान्य देण्यात यावे, सर्व विभागातील कर्मचार्यांना पदोन्नतीसाठी तीन-तीन महिन्यांनी कार्यशाळा
ठेवण्याकरीता संघटनेनी मागणी केली. १६ ऑक्टोंबर २०१६ च्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशी जगदिशिंसह केअर व शरद बोबडे यांनी दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन अशा पद्धतीने कंत्राटी कर्मचार्यांना शासकिय सेवेत सामावून घेण्यात यावे, सर्व विभागातील कर्मचार्यांना जीपीएफची पावती,दरवर्षी देण़्याबाबद संघटनेची मागणी ग्राह्य धरण्यात आली. आरोग्यसेविका ममता खोब्रागडे यांची बंदली शासननिर्णयान्वये करण्यात यावी. अशा अनेक विषयांवर सभेत सीईओ यांचेसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान सीईओ एम. राजा. दयानिधी यांनी जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या शासन निर्णयात असणार्या समस्या लवकरच निकाली काढण्यात येतील असे आश्वासन संघटनेला दिले. सभेला शिक्षणाधिकारी सुनिल मांधरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, नितीन काकडे,उल्हास नरड, बागडे हे उपस्थित होते. कास्ट्राईब संघटनेचे सुर्यभान हुमने, निवोद बन्सोड, विनय सुदामे, कृष्णकुमार कङ्गाणे, सिद्धार्थ भोवते, हरिश्चंद धांडेकर, अचल दामले, रूपेश हुमने, निशा पाचे,कौशल्या रावते, चंदाताई सिंधुपे, राज डहाट, हरी मटाले हे उपस्थित होते.