शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन उदासीन- आमदार बच्चू कडू

0
36

बिलोली (सय्यद रियाज ) दि. 10 —  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन उदासीन आहे यामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील लोकांना तेलंगाना राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या योजना पाहून तेथील आकर्षण वाटणे काही गैरनाही. महाराष्ट्रातील तेलंगणा सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर येऊ असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले . ते बिलोली तालुक्यातील प्रश्न सीमावर्ती भागाचे समन्वयक यांच्याशी बोलत होते .बच्चू कडू पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे .तेलंगणामध्ये लोकांना जावं वाटण्यात काही गैर नाही. तेलांगणा सीमावर्ती भागातील बिलोली तालुक्यातील सतरा गावच्या प्रश्नासंदर्भात मी दोन दिवस तेथे राहून प्रसंगी रस्त्यावर येण्याच्या साठी सज्ज आहे. ऑक्टोंबर अखेर या विषयावर स्वतंत्रपणे बैठक घेऊन आंदोलनात सहभाग घेण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी सीमावर्ती भागातील प्रश्नांच्या संदर्भात माहिती देऊन यापूर्वी शासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत त्यांच्याकडे सादर करण्यात आली. यावेळी माधव कुदळे, सुभाष पवार आदी उपस्थित होते.