बिलोलीच्या व्यापारी संकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0
10
बिलोली (सय्यद रियाज )   दि. ११ :   व्यापारी संकुल सुरू करावे या मागणीसाठी 17 सप्‍टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन अँड. धोंडीबा पवार यांनी दिले.बिलोली येथील व्यापारी संकुलाचा प्रश्न कीत्येक महिन्यापासून अधिकच चर्चेला आला होता. याबाबत एक चळवळच सुरू करण्यात आली होती. यानंतर या कामाला गती आली असली तरी लिलावाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. व्यापारी संकुलाचे महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या चळवळीचा भाग म्हणून स्वतः आंदोलन करण्याचा निर्णय घेताना दिसून येत आहेत.
बिलोली ते ज्येष्ठ विधितज्ञा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे अँड, धोंडबाराव पवार यांनी याबाबत जिल्हाधिकारी अरुणजी डोंगरे यांना निवेदनाद्वारे मागणी केली की मराठवाडा मुक्ति दिनाच्या पूर्वी व्यापारी संकुलाचा प्रश्न निकाली काढावा अर्थात लिलावाची प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा 17 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. अँड. धोंडीबा राव पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे व्यापारी संकुल अधिकच चर्चेत आले आहे.