संविधान वाचले तर ओबीसी समाज वाचेल – माजी मुख्यमंत्री छगन भूजबळ

0
15

@ ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. आयोजित संविधान सम्मान संमेलनात प्रतिपादन

# सेक्युलर च्या नावाखाली अन्याय केला गेला तर ओबीसी जनगणना मोदी सरकारच करू शकेल – पदूम मंत्री महादेव जानकर

# हिंदू – मुस्लिम ओबीसी समाज मिळून चळवळ उभी करू – शब्बीर अन्सारी

मुंबई. (विशेष प्रतिनिधी),दि.13 – संविधान के सम्मान में ओबीसी मैदान में या विषावर बोलयाचे तर कोठे बोलायचे संविधान वाचले तर ओबीसी समाज वाचेल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी तर ओबीसी जनगणना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकार मध्ये होऊ शकते असे पदूध मंत्री महादेव जानकर यांनी तसेच हिंदू मुस्लिम ओबीसी एकत्र आले तर सत्ता बदलू शकतो असे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ओर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांनी आयोजित संविधान सम्मान संमेलनात मरीन लाईन येथील बिर्ला हाऊस मुंबई येथे केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री छगन भूजबळ म्हणाले की, संविधान के सम्मान में ओबीसी मैदान में या घोषवाक्यावर संविधान वाचले तर ओबीसी समाज वाचेल. जगाच्या पाठीवर आज जे देश स्वातंत्र होत आहेत ते देश भारताच्या संविधांनावर आपले संविधान तयार करत आहेत. “सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा” कोणी लिहिले ‘मुहम्मद इकबाल’ यांनी दिली. “लाल किल्यावर पहिला तिरंगा कोणी फडकवला” होता ‘जनरल शहनवाज खान’ यांनी फडकवला होता. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है” घोषणा कोणी दिली 1921 मध्ये ‘बिस्मिल अजीमाबादी’ यांनी केले होते. आजच्या प्रमाणे “किमान 07 हजार कोटी रूपये भारत स्वातंत्र्य लढा साठी खर्च करणारे” त्याचे नाव ‘हज उस्मान शेख’ होते. “इंकलाब जिंदाबाद” ची घोषणा कोणी दिली होती ‘मौलाना हसरत मोहानी’ यांनी दिला. आपण सर्वजण जे भाषणानंतर “जय हिंद” हि घोषणा देतो ते प्रथम कोणी दिली तर ‘आबिद हसन सफरान’ यांनी केले होते. अशा थोर मुस्लिम लोकांनी भारतात योगदान दिले आहे. संविधानातून सर्वांना समान अधिकार देण्यात आला आहे. मंडळ आयोगाचे लढाई मोठी होती ती आम्ही सर्वजण लढलो. त्यात त्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला. जर आरक्षणातील 54 टक्के लोक एकत्र आले आणि त्यात जे 20 टक्के एस.सी व एस.टी एकत्र आले तर 75 टक्के होतात तर सर्वांची दांडी गुल होईल. असे भुजबळ म्हणाले. मंडळ आयोग हि मोठी लढाई आहे. राज्य शासनात फक्त 09 टक्के ओबीसी लोक नोकरी करत आहे. एमपीएससी, धनगर आरक्षण, स्कॉलरशिप आदी मुद्यांवर त्यांनी आपले मत मांडले. सन 1931 मध्ये ब्रिटीशांनी जनगणना केली त्यात 52 टक्के ओबीसी आहेत तरी सुद्धा 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी जनगणना व्हावी यासाठी आम्ही भांडत आहोत. केंद्र शासन ओबीसी साठी अनुकून आहे पण त्याच्या कडे ओबीसी चा डाटा नाही मागे कसे मदत करणार ? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

पदूम मंत्री तथा रासप अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो सेक्युलरच्या नावाखाली आपल्यावर अन्याय झाला. ओबीसी कमिशन आहे त्याला संविधानिक दर्जा मिळावा म्हणून आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या कडे मागणी केली. शब्बीर अन्सारी यांनी मुसलमानांच्या ओबीसी साठी जे केले आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखेच काम केले आहे. ओबीसींच्या मतांवर सरकार घाबरेल अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मुळे मी या व्यासपीठावर आहे. आज मी मंत्री म्हणून आलो नाही तर ओबीसी म्हणून आलो आहे. रा. स्व. संघ प्रमाणे जेव्हा काम कराल तेव्हा ओबीसीचा विकास होईल. भारताचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही. मुस्लिम समाजासाठी मदरसाला आम्ही कौशल्य विकास मध्ये आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली आहे त्या संधी चा फायदा घेत श्रीमंतांना लुटायचे आणि गरिबांना कसं वाटायचे हा धंदा आम्ही करणार आहे. ओबीसी ची जनगणना आमचे सरकारच करेन असे जानकर सांगितले.

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी म्हणाले की, राज्यातील सत्ता बदलू शकते असे सर्व ओबीसी समाजाचे नेते या मंचावर एकत्र आले आहेत. मी 1978 पासून काम सुरू केले, मी खूप वेळा मारही खाला, परंतु विचार सोडला नाही, प्रत्येक गावागावात मी फिरत राहिलो काम करत राहिलो. जो मुस्लिम सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागास असलेल्या समाजाचा विकास करण्यासाठी माझे हिंदू गुरु अॅड. जनार्दन पाटील, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, चौधरी मोहन प्रकाश, रामविलास पासवान यांनी मार्गदर्शन केले त्यामुळे आज मुसलमान समाजाला न्याय मिळत आहे. जे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांना तिकीट देताना अट टाकली जाते सभागृहात गप्प बसायचे काहीच बोलायचे नाही असा पद्धतीने आमचा आवाज दाबला जातो. संविधानात सर्वाना समान अधिकार दिले आहेत. संविधान आता नाही तर मागच्या सत्ताधारी लोकांनी तुकडे करण्यास सुरुवात केली. 123 वेळा संविधानात सुधारणा करण्यात आल्या. दरम्यान अभिनेता दिलीपकुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. रंगनाथ मिश्र आयोग आणि सच्चर समितीचा अहवालाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली नाही. राज्यात ओबीसीची ताकत काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. हिंदू – मुस्लिम ओबीसी मिळून चळवळ उभी करू असे अन्सारी यांनी सांगितले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले की, जेव्हा दोन ओबीसी भेटतील तेव्हा जय ओबीसी बोलायला शिका तरच ओळख पटेल आणि कामे मार्गी लागतील असा कानमंत्र त्यांनी दिला. कलम 340, 341, 342 प्रमाणे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. केंद्रात ओबीसी मंत्रालय सुरु व्हावे साठी आम्ही पाठपुरावा करत आहोत असे डॉ. तायवाडे म्हणाले. बारा बलुतेदार संघटना अध्यक्ष कल्याण दळे म्हणाले की, बारा बतुतेदार समाजाला परंपरागत स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जागा नाही. 10 लाख न्हावी समाजाचे सलून आहे तेच प्रचार केंद्र आहे म्हणून ओबीसी धोरण ठरवलं तर 2019 मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा होऊ शकतो. राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य डॉ. कैलास गौड म्हणाले की, हिंदू – मुस्लिम कट्टरपंथी सोडून एकत्र आले पाहिजे याचे धाडस या संघटनेने केले आहे. राज्यात ओबीसी समाजाला एकत्र आणूया असे गौड सांगितले. यावेळी कुणबी सेना संस्थापकीय अध्यक्ष विश्वनाथ पाटील म्हणाले की, सरकार ने शेतकऱ्याला आधार दिला नाही तर देश उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. ओबीसी समाजाला सक्रीय करण्याची काळजी गरज बनली आहे.

दरम्यान मुस्तफा फारूक, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, सचिव शाहरुख मुलाणी, राष्ट्रीय प्रवक्ते अब्दुलमिर्झा कय्युमनक्वी, मुंबई अध्यक्ष निजामुद्दीन राईन, राष्ट्रीय युवाध्यक्ष गुफरान अन्सारी, राज्यातील जिल्हाध्यक्ष, सचिव, तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते या संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.