मराठवाडा महासन्मान पुरस्कार सोहळ्यात डॉ. कलमूर्गे यांचा सत्कार

0
22
पुणे येथे 18 सप्टेंबर रोजी या गौरव सोहळ्याचे आयोजन
  बिलोली,दि.13ः-  मराठवाडा जनविकास संस्था व मराठवाडा मित्र परिवार पुणे आयोजित ” १७ सप्टेंबर २०१८ मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ” भव्य मराठवाडा महासन्मान पुरस्कार २०१८ ” कार्यक्रम २८ सप्टेंबर शुक्रवार सकाळी ११:४५ मि. पुणे येथे सोहळा पार पडणार आहे. मराठवाडाचे नाव देशात उंचाविणाऱ्या मराठवाडा रत्नांना ” मराठवाडा महासन्मान पुरस्कार २०१८ ” गौरविण्यात येणार आहे.
५०१ नागरीकांचा 0 % मोफत आरोग्य विमा नोदणी करण्यास येणार आहे. कांचन मुव्हिज प्रोडक्शन आयोजित भव्य ” घे- ताल ” सांस्कृतिक कार्यक्रम. बेटी बचाव,   बेटी बचाव ” मुलींच्या सन्मानात मराठवाडातील दिग्दर्शक व निर्माते आमदार फेम शिवाजीराव दोलतोडे ह्यांची ”  कन्या रत्न ” चित्रपट टिम ची भेट, तसेच ५० होतकरू विद्यार्थीना मोफत अभ्यासिका वर्ग. मराठवाडा विविध युवा व तरूण उत्कृष्ट  कार्य करणार्यांचा सत्कार करण्यात येणार असून या सत्कार सोहळ्यात नांदेड चे युवा रोजगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव डॉ. लक्ष्मीकांत गोविंदराव कलमूर्गे यांचे गौरव सोहळ्यात उत्कृष्ट सामाजिक सेवा तसेच रोजगाराभिमुख उपक्रम उत्कृष्टरित्या राबवित असल्याचे लक्षात घेऊन मराठवाडा जनविकास संस्थेच्या वतीने यांच्या सत्कारासाठी निवड करण्यात आले असल्याचे संस्थेचे डॉ. रोहित बोरकर यांनी सांगितले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना युवक – युवतीना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असून नौकरी आपल्या दरी अभियानाच्या अनुषंगाने ते चांगले उपक्रम राबवित असतात. यापूर्वी पण डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे याना दिल्ली येथील दि बेस्ट युथ लिडर, नांदेडरत्न पुरस्कार अशा प्रकारच्या पुरस्काराचे त्यांना मिळाले आहेत. येत्या शुक्रवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, शिवाजीनगर, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. रोहित बोरकर व डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.