अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
21
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ही कार्यवाही आज सकाळी करण्यात आली. वामन मुकुंदराज राऊत (रा. तिगाव ) यांच्या विरूध्द आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात गोंदिया जिल्हा अधीक्षकांच्या विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारू विक्री सुरू आहे. गस्ती दरम्यान तिगाव येथील रहिवासी वामन राऊत यांच्या घरी धाड मारली असता अवैध देशी दारूचा साठा आढळला. ही दारू पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी राऊत यांनी आमगाव येथील रहिवासी प्रमोद कटकवार यांच्या दुकानातुन दारू आणली असल्याची माहिती दिली. राऊतच्या विरोधात कलम ६५ (ई), ७७ (अ) व आरोपी प्रमोद कटकवार याच्याविरूध्द कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.