४ ते ६ टक्के विज दरवाढ-ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

0
16
महावितरण कंपनीने ३० हजार ८४२ कोटी रुपयांची महसुली तूट भरुन काढण्यासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. मात्र आयोगाने २० हजार ६५१ कोटींची तूट भरुन काढण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाकरता ३ ते ५ टक्के इतकी वीजदर वाढ केली आहे. पुढील वर्षीसाठी ४ ते ६ टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली. नवीन दर १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.महसुली तोटा भरुन काढण्याच्या नावावर महावितरणने केलेल्या वीज दरवाढमुळे सामान्य वीज ग्राहकांपासून तर उद्योग आणि कृषी पंपांचा वापर करणार्‍या शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. महावितरणच्यावतीने वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियमाक आयोगाकडे मोठी दरवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने महावितरणची मागणी फेटाळल्यानंतर आता महावितरणने पहिल्या टप्यातील वीजदरवाढ करुन सणासुदीच्या काळात ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे.
सर्वात जास्त दरवाढ ही कृषी क्षेत्रात असून वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांचे दर थोडे कमी करण्यात आले आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर भागांतील वीज ग्राहकांना हा दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामागे मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट कंपनीला अत्यल्प महसुली तुट भरुन काढायची असल्याचे कारण सांगितले जात आहे. महावितरणने केलेली वीजदरवाढ ही अपरिहार्य असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सध्या उत्सवांचा काळ सुरू झाला आहे.राज्यात गणेशोत्सवाची धूम असून सार्वजनिक पेंडॉलसाठी लागणारी वीज चोरी केली जाते. यावर उपाय म्हणून महावितरणने मंडळांसाठी अत्यल्प दरात वीज जोडणी देण्याची योजना सुरू केली आहे. इतके करुनही मंडळांकडून वीज चोरी केली जात असेल, तर महावितरण कारवाईसाठी सज्ज असल्याचा इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिला आहे.
 महावितरणाने ग्राहकांसाठी सध्या लागू असलेल्या (२०१८-१९) वीज दरात केवळ ३ ते ५ टक्के दरवाढ आहे. २०१९-२० च्या वीज दरामध्ये ४ ते ६ टक्के दरवाढ केली आहे.

– १०० युनिट पेक्षा कमी मासिक वीज वापर असलेल्या १.३२ कोटी निवासी ग्राहकांसाठी २४ पैसे युनिट इतकी वीज दरवाढ असणार आहे

– घरघुती ग्राहक वर्गवारीसाठी ३ ते ४ टक्के वीज दरवाढ

– उच्च दाब औद्योगिक ग्राहक वर्गवारीसाठी २ टक्के वीजदरवाढ

– कृषी ग्राहकांसाठी ५ ते ६ टक्के दरवाढ

– वाणिज्य ग्राहक वर्गासाठी ३ ते ४ टक्के वीज दरवाढ