केजरीवालांच्या हट्टापायी यादव व भूषण यांची ‘विकेट’ – मयांक गांधी

0
10

नवी दिल्ली – आम आदमी पार्टी पक्षात पेटलेला अंतर्गत कलह वाढतच असल्याचे चित्र आहे. बुधवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची सर्वात महत्त्वाच्या राजकीय व्यवहार समिती (पीएसी) मधून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आप नेते मयांक गांधींनी बंडाचा झेंडा उगारला आहे. या नेत्यांना समितीतून वगळल्याप्रकरणी मयांक गांधींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली होती. या बैठकीत योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची पीएसीतून उचलबांगडी करण्यात आली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील आपने उघड केला नव्हता. मात्र आपचे नेते मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे या बैठकीचा तपशील जाहीर केला. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव व प्रशांत भूषण पीएसीमध्ये असतील तर पक्षाच्या संयोजकपदाचा राजीनामा देईन अशी धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी स्वतःहूनच पीएसीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असे मयांक गांधी यांनी म्हटले आहे. बैठकीतील चर्चेची वाच्यता बाहेर होऊ नये यासाठी केजरीवाल यांनी मला तोंड बंद ठेवायला सांगितले असा आरोपही त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत काय झाले
मयांक गांधींनी पुढे सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना या दोघांबरोबर पीएसीमध्ये काम करण्यची इच्छा नाही, असे योगेंद्र यांना वाटत होते. पण योगेंद्र आणि प्रशांत पीएसी मध्ये नसले तरी आनंदी होते. त्यामुळे दोन प्रस्ताव आणण्यात आले…
पहिला प्रस्ताव – राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पहिला प्रस्ताव हा आणण्यात आला की, पीएसीची पुन्हा एकदा निवड केली जावी. पण त्यात यादव आणि भूषण यांचे उमेदवार नसतील.
दुसरा प्रस्ताव – सध्या आहे तीच समिती राहील केवळ त्याच्या बैठकांमध्ये योगेंद्र-प्रशांत सहभागी होणार नाहीत.
बैठकीदरम्यान काही वेळासाठी मनीष आणि दिल्ली टीमचे सदस्य (आशीष खेतान, आशुतोष, दिलीप पांडे आणि इतर) चर्चेसाठी एका बाजुला गेले होते. पुन्हा बैठक सुरू झाल्यानंतर मनीष यांनी प्रशांत और योगेंद्र यांनी पीएसीतून वगळण्याचा प्रस्ताव ठेवला संजय सिंह यांनी त्याला पाठिंबा दिला, आणि मतदान न घेण्याबाबत स्पष्टीकरण दिले.

मयांक यांनी ट्वीटद्वाके कोणाला वोट दिले आणि कोणाला नाही याबाबत स्पष्टीकरणही दिले. काही कारणांमुले मी मत दिले नाही. पहिले कारण म्हणजे, अरविंद पीएसीचे कामकाज कोणताही वाद न करता चालवण्याच्या मताचे होते. तसेच त्यांना एखादी दुसरी महत्त्वाची जबाबदारी दिली जावी या मताचा मी होतो. तसेच दुसरे कारण म्हणजे, सार्वजनिकरित्या हा प्रस्ताव मांडून या दोघांना हटवण्यात आल्याने मला धक्काच बसला. कारण हा निर्णय जगभरातील कार्यकर्त्यांच्या भावनांच्या विरोधात होता.

मयांक यांनी शेवटी ही माहिती सार्वजनिक केल्याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. मी माध्यमांमध्ये जाण्याऐवजी सर्व कार्यकर्त्यांसाठी हा ब्लॉग लिहिला. यामुळे माझ्यावर कारवाईही होऊ शकतो. पण तसे झाले तर होऊ द्या.