उर्जामंत्री गोंदियात ५ उपकेंद्राचे लोकार्पण करणार

0
12

गोंदिया,दि.१४= राज्य़ विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गोंदिया जिल्हयातील वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा व्हावा यासाठी जिल्हयात उभारण्यात आलेल्या ५, ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उर्जा नवीन आणि नविकरणीय उर्जा, राज्य़ उत्पादक शुल्क़, ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उदया दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी होणार आहे.गोरेगाव रोडवरील लक्की लॉन येथे सकाळी १० वाजता आयोजीत लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य़ मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले राहतील.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तिरोडा तालुक्यातील पांजरा, अर्जुनी मोरगाव येथील महागाव, गोरेगाव येथील मोहाडी, गोंदिया येथिल काटी उपकेंद्राचे ई-लोकार्पण होणार आहे. सोबतच जिल्हयात दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक विकास योजने अंतर्गत मुंडीपार, ठाणेगाव, कोकणा, ठाण, मुल्ला, तिरखेडी, रामनगर, रापेवाडा, गुमधावडा अशी ९ नविन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र प्रस्तावीत करण्यात आली आहेत. या प्रस्तावीत वीज उपकेंद्रांचा ई-लोकार्पण सोहळा याच ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाला खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे, खासदार अशोक नेते, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष सिमाताई मडावी,  गोंदिया नगर पारिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, आमदार सर्वश्री अनिल सोले, परिणय फुके, नागो गाणार, गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत उपस्तित राहणार आहेत. अशी माहिती महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य़ अभियंता सुखदेव शेरकर आणि अधिक्षक अभियंता  ओंकार बारापात्रे यांनी दिली आहे.