मुख्यमंत्री चांद्रबाबू नायडू व त्यांच्या साथीदारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

0
8

नांदेड,दि.14 : धर्माबाद बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध धर्माबाद पोलिस ठाण्यात 2010 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या प्रकरणी धर्माबाद कनिष्ठ स्तर न्यायालयात सुनावणीच्या वेळी सतत गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने चंद्राबाबू  नायडू यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध 16 ऑगस्ट रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या पाणीवाटपावरून महाराष्ट्र सरकार व आंध्रप्रदेश सरकार यामध्ये वाद निर्माण झाला होता सन 2010 मध्ये धर्माबाद बाभळी  बंधारा परिसरात जमावबंदीचा आदेश असताना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व त्यांच्या तेलुगु देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी धर्माबाद येथे येत असतानाच आंध्र महाराष्ट्र सीमेवरच त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवले होते. त्याला न जुमानता चंद्राबाबू धर्माबादच्या दिशेने आपल्या कार्यकर्त्यांसह येत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे धर्माबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चंद्राबाबू नायडूंसह त्यांच्यासोबत असलेल्या पंधरा तत्कालीन आमदार व कार्यकर्त्यांवर ताब्यात घेतले होते. तद्‌नंतर केंद्रातील तत्कालीन कॉंग्रेस सरकारने याबाबतीत लक्ष घालून चंद्राबाबू नायडू व त्यांच्या सहकाऱ्यांना नांदेड औरंगाबाद मार्ग हैद्राबादला परत पाठवले.
सन 2010 मधील हे प्रकरण आता धर्माबाद कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला आले आहे, परंतु आतापर्यंतच्या सुनावणीत चंद्राबाबू नायडू यांच्यासह साथीदार कुणीही न्यायालयात उपस्थित झाले नाही. यामुळे मा.धर्माबाद न्यायालयाचे न्यायाधीश गजभिये यांच्या न्यायालयाने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. यामध्ये त्यांचा समावेश आहे ते जी रामलू नायडू,  एन. नागेश्वर,  मल्लेराम, बी.जी.नायडू, उमा महेश्वर राव, व्ही.एच.विजय, रामराव, मुजफरोदिन अमिरोद्दीन, हणमंत शिंदे, माधअप्पा टि., अब्दुल खान रसूल खान, यशसोमजोजु, ए.एस. रत्नम  पी. सत्यनारायण  शिवडू, टी.प्रकाश गौड, आनंद बाबू यांचा पंधरा जणांचा समावेश आहे मात्र हे अटक वॉरंट आंमलात आणण्यासाठी नांदेड धर्माबाद पोलिसांना अजून यश मिळालं नाही. मुख्यमंत्र्यांसह सह आरोपीला अटक करण्यात पोलीस  अजून असमर्थ ठरले आहेत. चंद्राबाबू ला अटक झालीच तर पुन्हा बाभळी बंधारा पाणी प्रश्न पेटणार हे मात्र निश्चित. पुर्नयाचिका दाखल करण्याची महाराष्ट्र शासन तयारी असताना चंद्राबाबूंना अटक झाली तर हे प्रकरण वेगळे वळण सुद्धा घेऊ शकते हे या ठिकाणी लक्ष वेधण्या सारखे आहे.