मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांचे कार्य नवपिढीसाठी प्रेरणादायी- महापौर सौ.शीलाताई भवरे

0
34

नरेश तुप्तेवार,नांदेड,दि.15ः -मराठवाडा मुक्तीसंग्रामामधिल हुतात्म्यांचे कार्य नवपिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे यांनी व्यक्त केले.
70 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने छञपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था, पाथरड (ता.हदगांव) च्यावतिने काढण्यांत आलेल्या हुतात्मा गौरव रथाचा आज हुतात्मा स्मारक, गोकुळनगर,नांदेड येथून प्रारंभ करण्यांत आला यावेळी त्या बोलत होत्या.   हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेस महापौर सौ.शिलाताई किशोर भवरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्मा गौरव रथ आजपासून जिल्ह्यात मार्गस्थ करण्यांत आला.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष,दलितमिञ किशोर भवरे,संस्थेचे अध्यक्ष जगदेवराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.  70 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने या संग्रामातील हुतात्मा विरांच्या हौतात्म्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांचे कार्यास उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती जिल्ह्यातील विद्यार्थी,युवा व जनतेला व्हावी यासाठी छञपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था,पाथरड च्यावतिने हुतात्मा गौरव रथ काढण्यांत आला असून आज दि.14 सप्टेंबर रोजी नांदेड येथून निघालेला हा रथ टेळकी, कंधार,कल्हाळी, मुखेड, हानेगांव येथे जाणार आहे.दि.15 सप्टेंबर रोजी अर्जापूर,धर्माबाद, उमरी(रे.स्टे),किनी, इस्लापूर,वायपना येथे तर, दि.16 सप्टेंबर रोजी हदगांव,डोरली,पाटनूर, निवघा,मुदखेड येथून निघून मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी दि.17 सप्टेंबर रोजी नांदेड येथे या रथाचा समारोप होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जगदेवराव पवार यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी पूढे बोलतांना महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे म्हणाल्या की,मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये नांदेड जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले असून या संग्रामामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली आहे.या हुतात्म्यांच्या बलिदानाबाबत समर्पित भावनेने छञपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्था, पाथरड च्यावतिने जिल्हाभरामधून काढण्यांत आलेला हुतात्मा गौरव रथ नवपिढीसाठी निश्चीत मार्गदर्शक ठरणारा असून संग्रामातील हुतात्म्यांचा त्याग त्यांचे कार्य नवपिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचेही त्यांनी  कौतुक केले.याप्रसंगी संस्थेचे उत्तम पवार,मारोती महाराज,नागोराव कदम, संभाजी चव्हाण,विवेकानंद पवार,ज्ञानेश्वर शिलगिरे, बालाजी शिंदे,विजय कसेवाड,विष्णू कोंडामंगल,गणेश उमरे आदींची उपस्थिती होती.