जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती अभियान

0
42

गोंदिया,दि.15ः-भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निदेर्शानुसार शनिवार, आजपासून जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. ‘स्वछाग्रही से स्वछाग्रही’ या ब्रीदानुसार स्वच्छतेचा शास्वत संस्कार घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम संपूर्ण देशात राबविला जात आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ १५ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर होणार असून स्वच्छतेचा शपथ ग्रहणाचा कार्यक्रम घेण्यात येईल. १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक गावात स्वच्छता ग्रामसभा, तालुकास्थळी स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार असून हागणदारी मुक्त गावातील सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी, कर्मचारी, संपर्क अधिकारी, साधन व्यक्ती आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
अभियाना दरम्यान गृहभेटीसाठी संवादकांची निवड करुन वातावरण निर्मितीसाठी ग्रामसभा, कलापथ, डिजीटल व्हॅनव्दारे फिल्म शो आदीतून जनजागृती करण्यात येईल. १७ सप्टेंबर सेवा दिवस म्हणून पाळण्यात येणार असून र्शमदानातून शौचालय उभारणीसाठी खड्डे खोदो, परिसर स्वच्छता, प्लास्टिक गोळा करणे, नादुरुस्त शौचालय दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविण्यात येतील. १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान गावातील सार्वजनिक शौचालय, बसस्थानक, बाजार, पिण्याच्या पाण्याची टाकी, ग्रापं हद्दीतील सर्व कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
तसेच शालेय स्वच्छतादूत, पाणी व स्वच्छतेसंबंधी वक्तृत्व, निबंध स्पधेर्चे आयोजन करण्यात येईल. तसेच या अभियानात सक्रीय काम करणार्‍या महिलांचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात येईल. २४ सप्टेंबर रोजी समग्र स्वच्छताअंतर्गत अंगणवाडी सेविका, आशावर्कर, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, युवक, महिला बचत गट प्रतिनिधी, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक आदींना स्वच्छता व शौचालय बांधकामाच्या र्शमदान कार्यात सक्रीय सहभागी करण्यात येईल.
२५ ते ३0 सप्टेंबर दरम्यान आरोग्य केंद्र, उपकेंद्र, बाग, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, गावतलाव आदीठिकाणी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील एका महत्वाच्या पर्यटन ठिकाणी र्शमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती ‘स्वच्छ भारत दिवस’ पाळून प्रभातफेरी, स्वच्छता रथ आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.