‘बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढा’ चर्चासत्र

0
19

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.15 : आदिवासी वसतिगृह माजी विद्यार्थी ग्रुपच्यावतीने ८ सप्टेंबर रोजी येथील बचत भवनात ‘बोगस आदिवासी विरुद्ध न्यायालयीन लढा आफ्रोटची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी बँक आॅफ महाराष्ट्र लाखणी शाखेचे व्यवस्थापक कुंदन वल्के होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आफ्रोटचे अध्यक्ष राजेंद्र मरस्कोल्हे, सुरेश पेंदाम, प्राचार्य राजकुमार हिवारे, पो.नि. शिवराम कुंभरे, प्रा. डॉ. देवकुमार राऊत, प्रा. दिलीप धुर्वे, मनोहर चर्जे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व प्रथम भगवान बिरसामुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राणी दुर्गावती यांचे प्रतिमांचे पूजन करुन दिप प्रज्वलन करुन चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित आदिवासी मान्यवर वक्त्यांनी बोगस आदिवासी विरुद्ध सुरु असलेला न्यायालयीन लढा, १९७० ते २०१८ पर्यंतचा इतिहास तसेच आदिवासी समाजाच्या बाजूने लागलेले न्यायालयीन निवाडे व आफ्रोटची आतापर्यंतची व भविष्यातील बोगस आदिवासी संदर्भातील भुमिका या विषयी विस्तृत माहिती उपस्थित समाजबांधवांना दिली. संविधान बचाव व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट संदर्भातही माहिती देवून आदिवासी समाजाने संविधानाचा अभ्यास करुन तथा संघटित होवून अन्यायाविरोधात लढ्याचे व आदिवासी बहुल नक्षल प्रभावीत आदिवासी तरुण तरुणींनी शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिवासी समाजात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आदिवासी वसतिगृह माजी विद्यार्थी ग्रुपतर्फे जमा करण्यात आलेला सामाजिक न्यायालयीन लढा निधी आफ्रोटला हस्तांतरीत करण्यात आला.
कार्यशाळेला प्रकाश जमदाळ, जयपाल जमदाळ, सुरेश पेंदाम, ललीत कुंभरे, रवि कोकोडे, यशवंत कुंभरे, परमेश्वर उईके, मुरारी पंधरे, लक्ष्मीकांत मडावी, शिला उईके, रामेश्वर करचाल, लिलाधर ताराम, टिकाराम मारगाये, लक्ष्मण औरासे, लता उईके, वर्षा कुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोहर चर्जे यांनी मांडले.
संचालन प्रा. सुनिता उईके यांनी केले. आभार मोहन नाईक यांनी मानले. कार्यक्रसाठी आॅल इंडिया आदिवासी फेडरेशन व बिरसा मुंडा सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.