सेवानिृत्त शिक्षक शेख यांच्या शिक्षण सभापतीच्या हस्ते सत्कार

0
11

गोंदिया,दि.१५ः-जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्गत येत असलेल्या दांडेगाव(एकोडी) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरटोली (सहेसपुर) येथील ३ रे शिक्षण परिषद व सेवानिवृत्त शिक्षक सत्कार समारंभ कार्यक्रमाच शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडतांना एकनिष्ठता ठेवून कार्य करावे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रमेशभाऊ अंबुले यांनी केले.
ते शंकरटोली(सहेसपूर )येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती श्रीमती माधुरीताई हरिनखेडे,केन्द्रप्रमुख कु. माधवी राऊत यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक व शिक्षक उपस्थित होते.याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक आर. आर. शेख यांचा सत्कार शिक्षण व आरोग्य सभापती रमेशभाऊ अंबुले यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सप्तनीक करण्यात आला.पुढे बोलतांना आपल्याला शाळेसाठी तसेच विद्याथ्र्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कुठला उपक्रम आपल्याला राबवता येईल याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाला दांडेगाव केंद्रातंर्गत येणाèया शाळेतील शिक्षक उपस्थित होते.