युवा जागृतीच्या वतीने ओष्ठव्यंगांसाठी सर्जरी शिबिर

0
6

गोंदिया,दि.१५ : भारत सरकारद्वारे पुरस्कार प्राप्त युवा जागृती संस्थेच्या २१ नि:शुल्क प्लास्टिक सर्जरी शिबिर २३ सप्टेंबर रोजी स्थानिक गुरूनानक शाळेत सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.ज्या बालकांना, महिलांना व पुरूष जन्मापासूनच ओष्ठव्यंग आहेत त्यांची प्लास्टिक सर्जरीकरिता पाढर येथील दवाखान्यात सर्जन डॉ. राजीव चौधरी व त्यांची टीम निवड करणार आहे. भारतात जवळपाल ८०० बालकांमध्ये एका बालक ओष्ठव्यंग जन्मास येतो. युवा जागृतीच्या वतीने मागील २० वर्षांपासून १०३२ बालकांची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. या शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, नरेश अग्रवाल, प्रकाश तिडके, विष्णू शर्मा, मेहबुब हिरानी, राजेश बन्सोड, प्रसाद नायडू, जितेंद्र परमार, धापाडे, भाटीया, सोनू सावंत, विजय अग्रवाल, विजय बजाज, हितेश बग्गा हे परिश्रम घेत आहेत..