स्वः शंकरलाल अग्रवाल महाविद्यालयाचा व्हॅलीबाल संघ जिल्हा स्तरावर

0
8

गोंदिया दि.१५.;-: येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत स्वः शंकरलाल अग्रवाल ज्यु.सायन्स कॅालेज सूर्याटोला, गोंदिया 19 वर्षे वयोगटातील विध्यार्थीच्या व्हॅलीबाल संघाने अंतिम सामन्यात गोंदिया पब्लिक स्कूलच्या संघाचा पराभव करून विजय सम्पादन केला आहे. क्रीडा शिक्षक प्रा.अनिल रहांगडाले,प्राचार्या नीलिमा सुखदेवे,प्रा.प्रमोद अम्बुले,प्रा.हर्षद लाडे,प्रा.विवेक साखरे,प्रा.गोडिल मॅम यांच्या मार्गदर्शनात आरिफ  शेख,शशीकांत उपवशि, तौशिफ सिद्दीकी,अंकुश घोड़ेस्वार,करन,नावेद या खेळाडूंनी विजयी कामगिरी केली. संथेचे सचिव प्रफुल्ल अग्रवाल यांनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.