जि.प.च्या प्रवेशव्दारावर कर्मचार्यांचे निदर्शने

0
11

गोंदिया,दि.16 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्यांशी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेली अशोभनिय वर्तवणूक आणि तीन दिवसीय राज्यव्यापी संपाचे वेतन कपातीचे निर्णयाविरोधात कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकार्यांनी १८ सप्टेंबर रोजी जि.प. समोर असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लीलाधर पाथोडे यांना १४ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चेला बोलविण्याऐवजी हे आंदोलन केले. तर आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिल्याने २१ प्रवर्ग संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा मुख्यालयातील सर्व कर्मचार्यांनी एकत्र येऊन (दि.१५)दुपारी २ वाजता सुमारास जि.प. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत निषेध नोंदविला.

७,८ व ९ ऑगस्ट रोजी कर्मचाNयांनी मागण्यांना घेवून राज्य शासनाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यानुरुप कोणत्याही कर्मचार्याचे वेतन कपात केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वेतन कपात करण्याचे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले. हा लढा जि.प.च्या विरोधात नसून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात असल्याने शासनाचे आदेश येईपर्यंत सप्टेंबरच्या वेतनात कपात करण्यात येऊ नये, असे विनंती अर्ज सीईओ यांना देण्यात आले. परंतु, सीईओंनी जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकाNयांना न जुमानता एकतर्फी निर्णय घेण्याचे बोलले. त्यामुळे समन्वय समितीने सभेत ठराव घेवून १८ सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाNयांनी असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी सीईओ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सांगितले.त्यानुरुप १५ सप्टेंबरपर्यंत तोडगा निघाला नाही, तर १८ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व कर्मचाNयांचे एकदिवसीय असहकार आंदोलन करण्यात येणार असे ठरले. परंतु, सीईओ यांनी १४ सप्टेंबरला संघटनेचे निमंत्रक लीलाधर पाथोडे यांना चर्चेला बोलाविण्याऐवजी आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिल्याने संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा मुख्यालयातील सर्व कर्मचाNयांनी एकत्र येऊन दुपारी २ वाजता जि.प. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने देवून निषेध नोंदविला. यावेळी राज्य कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक लीलाधर पाथोडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.जी. शहारे, पुरोगामी संघटनेचे सरचिटणीस हरिराम येळणे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, प्रांतीय अध्यक्ष मिलिंद मेश्राम, शिक्षक भारतीचे प्रकाश ब्राह्मणकर, जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके, विरेंद्र कटरे, एल.यू. खोब्रागडे,भारती तिडके, सुरेंद्र जगणे, सौ. नानन बिसेन,साधना साखरे,शैलेष बैस,सुभाष खत्री,अजय खरवडे,संतोष तोमर,लिलाधर तिबुडे,मनोज मानकर, व २१ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.