मनाने पराभूत माणूस कधीच जिंकू शकत नाही-जया किशोरी

0
38

गोंदिया,दि.16 : प्रत्येक माणूस आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कठिण परिश्रम करतो. यामुळे कधी त्याला पराजयाचा सामना करावा लागतो. पराजयानंतर निराश होता कामा नये. पुन्हा खंबीरपणे उभे राहून आपली कार्य करण्याची क्षमता वाढवून यश आपल्या पदरी पाडून घ्या. ज्या कार्याला आपण हातात घेतले आहोत त्याला वेळेवर पूर्ण करायला पाहिजे. कारण मनाने पराभूत माणूस कधीच जिंकू शकत नाही. कारण आपले जीवनच हा एक संदेश असल्यामुळे वेळेवर काम करा, कामावर प्रेम करा, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये दया, प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. यामुळे खऱ्या समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन जया किशोरी यांनी १५ सप्टेंबर रोजी नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित शैक्षणिक सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

मनोहरभाई पटेल अकादमी तथा गोंदिया शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे मार्गदर्शक खासदार प्रफुल्ल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये जया किशोरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविकात राजेंद्र जैन म्हणाले, मनोहरभाई पटेल अ‍ॅकॅडमी व गोंदिया शिक्षण संस्था निरंतर विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी कार्यरत असून आम्ही दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. जया किशोरी यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, कमी वयापासून आध्यात्मिक क्षेत्रात आपले नाव जया किशोरी यांनी संपूर्ण भारतभर केले असून याचे श्रेय त्यांनी आपले वडील शिवशंकरजी यांना दिले..

कार्यक्रमात जया किशोरी, शिवशंकर शर्मा, ब्रजेश शर्मा, दीपक ओझा, मनीष अग्रवाल, दिनुजी यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच भागवतकथा आयोजक हुकुमचंद अग्रवाल परिवाराचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जया किशोरी यांच्या आगमनप्रसंगी डी.बी. सायन्स कॉलेजमध्ये संस्थेचे सचिव राजेंद्र जैन आणि संचालक निखिल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच विविधतेतून एकतेचे दर्शन देत नमाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून जया किशोरी व शिवशंकर शर्मा यांचे स्वागत केले. स्वागतानंतर जया किशोरी यांनी डी.बी. सायन्स कॉलेज व नमाद महाविद्यालयाचे विविध विभाग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्षाला भेट दिली..

कार्यक्रमाला राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, दामोदर अग्रवाल, चेतन बजाज, सूरज गुप्ता, पवन अग्रवाल, नदालजी, डॉ. राधेश्याम अग्रवाल, सुरेश अग्रवाल, मधु अग्रवाल, निखिल जैन, विनोद हरिणखेडे, अशोक सहारे, राजू एन. जैन, नानू मुदलीयार, नरेश जैन, गोविंद अग्रवाल, अपूर्व अग्रवाल, राजेश वर्मा, जिम्मी गुप्ता, प्रा. अंजन नायडू, प्रा. रजनी चतुर्वेदी, प्रा. मृत्यूंजय सिंग, रूपा मिश्रा, हरगोविंद चौरसिया, बी.आर. शर्मा, आलोक द्विवेदी, माधुरी नासरे, शारदा महाजन, आशिष वर्मा, इजाज शेख, शफीउल्ला खान, विजय मोहबे, केतन तुरकर, लखन बहेलिया, विनोद पटले, बबन मेश्राम, संजय जगने, भावेश जसानी, उर्विल पटेल व अन्य उपस्थित होते.