स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण परिषदेचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी

0
20

गोंदिया,दि.16 : छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले वैदीक राज्याभिषेक झुगारून २४ सप्टेंबर १६७४ दुसरा शाक्त राजाभिषेक करून रयतेचे शेतकर्यांचे राज्य निर्माण केले. त्या दिवसाची आठवण म्हणून महात्मा जोतिबा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून शिक्षण प्रसारातून सत्यशोधक विचारांचा पायंडा घातला. अशा या स्थापना दिनाची आठवण रहावी, म्हणून शिक्षण अधिकार संघर्ष समिती गोंदियाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी स्थानिक पोवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण परिषदेत युपीएससी, एमपीएससी,बँकिंग, एसएससी, रेल्वे, यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांवर जिल्ह्यातील विद्याथ्र्यांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी
तसेच संवैधानिक शिक्षण व्यवस्थेवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात संवैधानिक हक्क संरक्षण व सामाजिक न्यायच्या अंमलबजावणीसाठी स्पर्धा परीक्षा तयारीचे तंत्र यावर दिपक बहेकार,संचालन ब्लॅक ब्रिटिश अ‍ॅकडमी,
उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते तसेच पुणेचे अभय लांडगे मार्गदर्शन करणार आहेत. दुसर्या सत्रात शिक्षण हक्क अधिनियम व समोरील आव्हाने यावर ओबीसी
संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,डॉ. दिलीप चव्हाण, रमेश बिजेकर,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. बी.एम. करमकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण अधिकार संघर्ष समिती,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,सविंधान बचाव समिती,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक पुरोगामी शिक्षक संघटना गोंदियासह इतर संघटनांनी केले आहे.