‘स्वच्छता ही सेवा’ मुलमंत्र सर्वांनी स्विकारावे-सिमाताई मडावी

0
14

गोंदिया,दि.16 : वैद्यक्तीक स्वच्छता प्रत्येक व्यक्ती पाळते. आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो. मात्र, परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून, प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमाताई मडावी यांनी केले. स्थानिक स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह येथे (दि.१५) स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. दरम्यान जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी सर्व उपस्थित कर्मचाNयांना स्वच्छतेची शपथ दिली.

केंद्रीय पेजयल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, गोंदिया पंचायत समितीचे सभापती माधुरी हरिणखेडे, सालेकसा पंचायत समितीच्या सभापती अर्चना राऊत, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ए.के. मडावी, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता

एस.के. शेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. वैरागकर,
लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय विश्वकर्मा, समाज कल्याण अदिकारी मिलींद रामटेके उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीने श्रमदान करण्याची गरज व्यक्त करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वर्तणूकीतील बदलावर भर दिला, ते म्हणाले कोणतेही खाद्य पदार्थ घेतल्यास त्यातील टाकावू कचरा आपण उघड्यावर
फेकतो. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणात अशाप्रकारे कचरा टाकून आपण आपलाच परिसर अस्वच्छ करतो. ही प्रवृत्ती बदलविणे आता गरजेचे असून कचरा योग्य ठिकाणात टाकण्याची सवय लावण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे संचालन माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले तर आभार शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद रहांगडाले यांनी मानले.यशस्वीतेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक सुर्यकांत रहमतकर, राजेश उखळकर, पाणी गुणवत्ता, मुकेश त्रिपाटी, दिशा मेश्राम, लेखाधिकारी जितेंद्र येरपुडे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तज्ञ बालकिशोर पटले, मुल्यपान व सनियंत्रण तज्ञ विशाल मेश्राम, क्षमता बांधणी तज्ञ देवानंद बोपचे, मुल्यमापन व सनियंत्रण तज्ञ श्रीमती शोभा फटींग, वित्त नी संपादणूक अधिकारी छाया सहारे, रमेश उदयपुरे यांनी परिश्रम घतेले.