सोमा हरिणखेडेची आत्महत्या नव्हे तर हत्याच,कुटूबियांचा आरोप

0
13

गोंदिया,दि.१७ः-गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या फूलचूर निवासी सोमा हरिणखेडे यांचा मृतदेह रविवारला गोंडीटोला-टेमणी गावाजवळील एका शेतातील झाडाला गळफास घेतल्याच्या रुपात आढळून आला असला तरी कुटुबियांनी मात्र आत्महत्या नसून त्यांची हत्याच करण्यात आल्याची शंका व्यक्त केली आहे.मृत सोमा हरिणखेडे यांचा मुलगा विजय सोमा हरिणखेडे यांने दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी याघटनेशी संबधित तिघाविरुध्द गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे.दरम्यान त्या तिघांना वाचविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनींधीच्या प्रतिनिधींनी पोलिसावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.अटक केलेल्या संशयितामध्ये योगराज नागपूर,मनोज नागपूरे,सुखी उपवंशी व सुखी उपवंशी यांच्या जावयाचा समावेश आहे. मृतक सोमा हरिणखेडे यांचे बरबसपुरा निवासी सुखी उपवंशी सोबत प्रेमसबंध असून काही दिवसापुर्वी त्यांच्या वादविवाद झालेला होता.घटनेच्यापुर्वी संबधित संशयित आरोपींनी १५ सप्टेंबरला फूलचूर येथील त्यांच्या घरुन त्यांना नेऊन मारहाण करुन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गळपास लावून ठार केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन कलम ३०२,३६३ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी योगराज नागपूरे यांनी घेऊन गेल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सोमा हरिणखेडे यांनी गोंदिया पोलीसात कार्यरत नातेवाईक पोलीस शिपाई सुभाष बिसेनला फोन करुन आपणास मारहणा करीत असल्याची माहिती दिली.त्यानंतर लगेच सुभाष बिसेन यांनी फिर्यादीच्या काकूला माहिती दिल्यानंतरस फिर्यादीला माहिती मिळाली.त्यानंतर शोधघेण्यासाठी गेलो असता फोन बंद आल्याने परत आलो परंतु तक्रार दिली नव्हती.परंतु दुसèया दिवशी आमचे जावई यांनी सकाळी ७ वाजेच्या सुमारास फोन करुन सासरे सोमा हरिणखेडे यांचे मृतदेह करंजीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिल्याने आम्ही लगेच घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी ज्यावस्थेत वडीलांचा मृतदेह झाडाला लटकलेला होता त्यावरुन त्यांना मारुन लटकविण्यात आले असावे अशी आमची शंका असल्याचे विजय हरिणखेडे यांचे म्हणने आहे.या घटनेनंतर बरबसपुरा येथील काही नागरिकांनी आज गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती.