नाना पटोलेंनी स्विकारले कॉंग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सुत्र

0
13

भंडारा,दि.१7ः-भंडारा गोदीया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार नाना पटोलें यांनी भाजप सोडल्या नंतर गेल्या प्रथम महाराष्ट्राचे काँग्रेस उपाध्यक्ष म्हणुन पद देण्यात आले होते. नंतर र भंडारा गोदिंया लोकसभा पोटनिवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यात केेलेल्या कार्याची पावती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी  १५ सप्टेंबरला नाना पटोले यांना पदोन्नती देत राष्ट्रीय काँग्रेस किसान खेत मजदुर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले.त्या पदाची सुत्रे आज दिल्ली येथील अकबर रोड वरील कॉंग्रेस पक्ष मुख्य कार्यालयातील किसान खेत मजदुर कार्यालयात स्विकारली. यावेळी देशातील अनेक भागातून आलेले कार्यकर्ते व नेत्यांची उपस्थिती होती.