वेतन कपात निर्णयाकरिता आयुक्तांनी मागितले अभिप्राय

0
6

गोंदिया,दि.17 : राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांकरिता 7,8,9 ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या विनंतीवरून घेण्यात आला होता. शयासनाने आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करावे, की करू नये असा निर्णय दिला नाही. असे असताना देखील गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांनी वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. यावर जिल्ह्यातील संघटनांनी आक्षेप नोंदविला. नागपूर विभागाचे आयुक्त यांनी वेतन कपात योग्य की अयोग्य यासंदर्भात राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला आहे. त्यासंदर्भात त्यांनी आज(दि. 17) पत्र पाठविले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला निर्णय कायम राहतो की वेतन कपातीचा निर्णय रद्द करण्यात येतो, याकडे जिल्हा परिषदेच्या 9000 कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
कामबंद आंदोलन आज
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिईकरी यांनी संघटनेचे सरचिटणीस यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. आता पुन्हा कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याविरोधात जिल्ह्यातील कर्मचारी उद्या मंगळवारी (ता.18) असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.