शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करण्यासाठी तात्काळ खरेदी केंद्र सुरू करा-देवसरकर यांची मागणी

0
6

नांदेड दि.18- शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भावाने खरेदी करण्यासाठी तात्काळ सरकारने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी ही मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांचा शेतातील मुग,उडीद हे पीक आले असून शेतकरी ते माल विक्रीसाठी बाजारात आणत आहे.व्यापारी मात्र माल खरेदी करताना त्यांच्या मनानुसार खरेदी करत आहे.अगोदर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेत माल व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावं लागत आहे.त्यामुळे मोठ आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागत आहे.यामुळे सरकारने तात्काळ हमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरेदी केंद्रे सुरू करावी.यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान कमी होऊन त्यांचा फायदा होईल अशी मागणी यावेळी निवेदनात भागवत देवसरकर यांनी केली.यावेळी निवेदन देताना जिल्हाध्यक्ष प्रशांत आबादार,मंगेश गवळी,अंकुश शिरफुले उपस्थित होते