आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

0
9
२१ सप्टेंबर २००४ ला माओवादी पार्टीची स्थापना करण्यात आली होती. या पार्टीचा १४ वा स्थापना दिवस गावागावात साजरा करावा, पार्टी जनसेना व जनवादी राजसत्ता मजबुत करण्यासाठी व त्याच्या विस्तारासाठी जनयुद्ध तीव्र करा. सोबतच लुटमारी, शोषणापासून जनतेची सुटका व जन समाजाच्या स्थापनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ज्यांनी लढा देऊन प्राणाची आहुती दिली, त्या शहिदांना नमन करा, संघप्रणित भाजप सरकारकडून चालविण्यात येणाऱया योजनेचा विरोध करा, असे आवाहन या बॅनरमध्ये करण्यात आले आहे. यात भाकपा (माओवादी) एरिया कमेटी पेरमिली, असा उल्लेख आहे.

या परिसरात अशा प्रकारचे बॅनर पोळ्याच्या दिवशीही आढळून आले होते. तेव्हा नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून अटक केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची पुणे पोलिसांनी बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली होती. आठ दिवसांत पुन्हा याच परिसरात नक्षली बॅनर आढळून आल्याने गावकऱयांत भिती पसरली आहे. ही घटना लक्षात येताच पोलिसांनी बॅनर जप्त केले असून नक्षली सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे.