मुख्य बातम्या:

युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल

नागभीड ,दि.18ः- नागभीड-नागपुर रोडवरती शासकिय विश्रामगृहा जवळ सोमवारला सांय ७वा.युवतीने युवकावर चाकुने वार करुन गंभीर जख्मी केल्याची घटना घडली असुन परीसरात एकच खडबळ उडाली आहे. त्या युवतीवर नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार युवती ममता बनकर रा. खरबी.ता.ब्रम्हपुरी हीने युवक किशोर जगदीश पाथोडे रा.चिचोली.ता. नागभीड हृयाच्या सोबत सोमवारला सांय ७वा. शासकिय विश्राम गृहा समोर जोरदार भांडण करुन त्याच्या वर आपल्या हाथातील चाकुने चेहऱ्यावर व गळ्यावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यात किशोर पाथोडे हा गंभीर जख्मी होऊन रक्त भंबाळ झाला. त्याला लगेच नागभीड च्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नागपुरला भरती करण्यात आले.युवती ममता बनकर हिला चंद्रपुर येथे भरती करण्यात आले. फिर्यादी देविदास शामराव नान्हे रा.नवानगर नवखळा याने याप्रकरणाची नागभीड पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून ममता बनकर हिच्या विरुद्ध अराध क्र .३६५/१८कलम ३०७अन्यवय गुन्हा दाखल केला आहे. याघटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पी.पी.शेवाळे करीत आहेत

Share