मुख्य बातम्या:

पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा

 वाशिम, दि. १८ : पालकमंत्री संजय राठोड हे बुधवार, दि. १९ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड हे दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता यवतमाळ येथून कारंजाकडे प्रयाण करतील. दुपारी १२.३० वाजता त्यांचे कारंजा लाड येथे आगमन होईल. जवान सुनील धोपे यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेतील. त्यानंतर ते दुपारी १ वाजता शासकीय वाहनाने मंगरूळपीरकडे प्रयाण करतील.

दुपारी १.२० वाजता पालकमंत्र्यांचे मंगरूळपीर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. याठिकाणी ते आकांक्षित जिल्हा, शांतता व सुव्यवस्था, मिझल्स रुबेला लसीकरण, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रपत्र ड सर्वेक्षण याविषयी आढावा बैठक घेतील. दुपारी १.४५ वाजता ते टाऊन हॉलकडे प्रयाण करतील. याठिकाणी दुपारी २ वाजता शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहून सायंकाळी ५ वाजता श्री. राठोड कारंजा मार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील.

Share