मुख्य बातम्या:
पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर# #स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार

गोंदिया,दि.१८-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या कर्मचाèयांच्या वेतन कपात निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाèयांत असंतोष असून आज मंगळवारला लेखनी बंद आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य  कार्यकारी अधिकारी यांच्याकृतीचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघासह इतर संघटनांनी निषेध नोंदविला.त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर द्वारसभा घेत घोषणाबाजी करण्यात आली.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे शासनबाहय धोरण राबवून कर्मचारी संघटनांशी जुळवून घेण्याएैवजी हुकूमशाही पध्दतीने काम करीत असल्याने पुढच्या आठवड्याच मुख्य सचिवांकडे तक्रार करुन हटविण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर्मचारी जिल्हा परिषद महासंघाचे राज्य अध्यक्ष रमेशचंद्र चिलबुले यांनी दिली.
विशेष म्हणजे आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.त्यातच आंदोलनात सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने कंत्राटी कर्मचारी वर्गाची मदत बैठकीसाठी घेण्यात आली होती.त्यातही प्रोसेंडिग लिहिणारे कर्मचारीही न गेल्याने सामान्य प्रशासन विभाग प्रमुखाची चांगलीच पंचाईत झाली.जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांनी आंदोलक कर्मचारी यांची बाजू घेत मुद्दा उपस्थित केला.त्या मुद्यावर सीईओ राजा दयानिधी यांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही.तर अध्यक्ष सीमा मडावी व जि.प.उपाध्यक्ष हामीद अल्ताफ शेख यांनीही उत्तर दिले नाही.जेव्हा या मुद्यावर अध्यक्षांना संघटनेने निवेदन दिल्यानंतर आयुक्तांशी चर्चाही अध्यक्षांनी केल्याचा मुद्दा हर्षे यांनी उपस्थित केला होता.
राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांकरिता ७,८,९ ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या विनंतीवरून घेण्यात आला होता. शासनाने आंदोलनात सहभागी कर्मचाèयांचे वेतन कपात करु नये या मुद्यावर मुख्य सचिवांनी सकारात्मक पुढाकार घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेले होते.त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तीन दिवसाच्या संपकाळातील वेतन कपात करण्यासंबधी कुठलेही निर्देश दिलेले नसतांना गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधि यांनी वेतन कपात करण्याचे पत्र दिले.त्या अगोदरच अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांनीही स्वमर्जीनेच वेतन केले.या सर्व मुद्यावर राज्य कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेले असता त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत वेतन कपात करणार असे सांगून चर्चेला नकार दिल्याचा आरोप निमंत्रक लिलाधर पाथोडे यांनी केला.
चिलबुले यांनी कर्मचारी संघटना या प्रशासन व शासनाशी संवाद साधण्यासाठी असतात परंतु गोंदियाचे सीईओ हे सवांद शाधायलाच तयार नसल्याने कर्मचारी वर्गाचे प्रश्न सुटू शकत नाही.सीईओंनी हूकूमशाही पध्दतीने काम सुरु केले असून सरकारही भांडवलशाही पध्दतीने काम करु लागली आहे.राज्यात कुठल्याच जिल्ह्यात वेतन कपात झालेले नसतांना गोंदियाच्याच सीईओंनी कसे वेतन कपात केले असा प्रश्न उपस्थित करीत कपात केलेली रक्कम वेळेच्या आत सबंधित कर्मचारी यांच्या खात्यावर वळती न केल्यास भविष्यात पोलिसात तक्रार करण्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही आणि त्यावेळी जिल्ह्याव्यापी आंदोलनाला सुरवात करण्यात येईल अशा ईशारा दिला.आंदोलनात राज्य उपाध्यक्ष अशोक दगडे,निमंत्रक लिलाधर पाथोडे,जिल्हाध्यक्ष पी.जी.शहारे,शैलेष बैस,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कमलेश बिसेन,कार्तिक चव्हाण,राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,शिक्षक समितीचे मनोज दिक्षीत,चंद्रहास सुटे, भंडाराचे अतुल वर्‘ा, नागपूरचे प्रशांत कातुरे, गडचिरोलीचे रतन शेंडे, चंद्रपुरचे कुलदीप कुंभरे, ‘िलींद ‘ेश्रा‘, व्ही.आर. खांडेकर, सुरेंद्र जगणे, डी.टी.कावळे, व्ही.आर. नि‘जे, ए‘.आर. ‘िश्रा, आशिष रा‘टेके, एस.ङ्मू. वंजारी, एल.ङ्मू.खोब्रागडे, विनोद चौधरी, दिवाकर खोब्रगडे,
लिलाधर तिबुडे,एच.आर.लाडे यांच्यासह आqदनी विचार व्यक्त केले.यावेळी गुणवंत ठाकूर,अजय कोठेवार, नागसेन भालेराव,ए ल.आर. ठाकरे, संध्या काळे, वैशाली खोब्रागडे, साधना लिल्हारे, स्नेहल वाढकर, शितल ङ्मादव, अरुणा पटले, वंदना बघेले, ए‘.के. सतदेवे, विशाखा शहारे, कुंदा उके, वनिता दखने, तेजस्विनी चेटुले, संतोष तुरकर, संतोष तोमर,मनोज मानकर, के.टी.पटले,निशा बिसेन, चित्रा ठेंगरी, शीखा पटले, शालू पटले, पुष्पा जाधव, स्वाती भोयर,रेखा ठाकरे, नंदा बन्सोड, संजू खोब्रागडे, सुषमा बढाई,सुशीला खंडायीत, विमल शहारे,प्रदिप मेंढे,शालू भोगे,शुखावंती सुलाखे आदी सहभागी झाले होते.संचालन अजय खरवडे यांनी केले.
Share