लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात

0
8

गोंदिया,दि.18ः- जिला परिषद गोंदिया येथील राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियान  अंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्षातील उपअभियंता सुनिल तरोणे यांना तक्रारकर्ता विद्युत कंत्राटदाराकडून १ लाख रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना आज घडली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील भानपुर, दरेकसा, ककोडी स्थित प्राथमिक आरोग्य केंद्र व वेअर हाऊस बिल्डिंग डीपीएमयु युनिट जिल्हा परिषद गोंदिया आदि ईमारतीच्या विद्युतीकरण कामाचे आदेश दिले होते.त्यापैकी दरेकसा व ककोडी येथील काम पुर्ण झाल्याने त्या कामाचे देयके काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार विद्युत कंत्राटदाराने 3 सप्टेंबरला केली होती.त्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कार्रवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, सहायक उपनिरीक्षक दिवाकर भदाडे, हवलदार राजेश शेंद्रे, प्रदीप तुलसकर, नायक रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन, गिता खोब्रागडे, देवानंद मारबते या टिमने केली.