शपथपत्र भरल्याशिवाय राॅकेल नाही

0
20

गोंदिया,दि.19-  एकाच कुटुंबातील कोणत्याही किंवा शिधापत्रिकेवरील सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्यांनी अनुदानित केरोसिन योजनेचा लाभ घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियम व भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार शिक्षेची तरतूद असल्याचे परिपत्रक पुरवठा विभागाने काढले आहे. सिलिंडर नसलेल्या कुटुंबांना अनुदानित केरोसिन योजनेअंतर्गत महिन्याला ६ लिटर केरोसिन २७.७३ रुपये लिटर दराने मिळतो. परंतु आता सवलतीचा लाभ घेणाऱ्यांनी शपथपत्र दिल्याशिवाय केरोसिन मिळणार नाही.