शहानी घेतली संघ मुख्यालयात भेट

0
9

नागपूर – आज सकाळी नागपुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी नागपूरचे पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे आणि महापौर प्रवीण दटकेंसह स्थानिक भाजप पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर शाह यांनी महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात हजेरी लावली. या ठिकाणी ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची भेट घेतली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा होता. शिवाय येत्या १३ ते १५ मार्च दरम्यान नागपूरला संघाच्या होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर आजचा त्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका आणि काही महिन्यांनी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका, केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार असल्याचे बोलले जाते. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी कुटुंबासह ताडोब्याला आहेत. भाजपाध्यक्ष नागपुरात असताना, गडकरींची अनुपस्थिती, यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.