राफेल घोटाळा, काँग्रेसचा अमरावतीत एल्गार

0
5

अमरावती,दि.25 : राफेल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराने मोदी सरकारचे हात बरबटले आहेत. संरक्षण नियमावली गुंडाळून राफेल विमाने खरेदीचा करार झाला आहे. या देशविघातक मुद्यावर जाब विचारण्यासाठी काँग्रेसने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी वाढती महागाई, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी रेटण्यात आली.
जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा धडक मोर्चाद्वारे भाजप सरकारचा कडाडून निषेध करण्यात आला. मोर्चास प्रारंभ करण्यापूर्वी स्थानिक ईर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हारार्पण व अभिवादन करण्यात आले. काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर, माजी आमदार केवराम काळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी उपाध्यक्ष सतीश हाडोळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छाया दंडाळे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकताच काँग्रेस नेते भाजप सरकारविरोधी आक्रमक झाले. राफेल विमान खरेदीत घोटाळा झाला असून, गोपनीयतेच्या नावाने भाजप सरकारने खासगी कंपनीमार्फत करार केला आहे.

जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, यशवंतराव शेरेकर, जिल्हा परिषदेचे सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, गिरीश कराळे, प्रकाश साबळे, अरुण वानखडे, प्रमोद दाळू, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, भागवत खांडे, बिटू मंगरोळे, दयाराम काळे, महेंद्र गैलवार, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, नितीन दगडकर, सुरेश निमकर, अर्चना मेश्राम, श्रीराम नेहर, मनोज देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अभिजित देवके, आदी सहभागी झाले होते.