रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या तर शेतकऱ्याचा कालव्यात पडून मृत्यू

0
10
सविस्तर असे की रेल्वे कर्मचारी निलेशने सोमवारी दिवसभर कार्यालयात काम केल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी परतला होता.त्यानंतर आज सकाळच्या सुमारास घरच्यांना  बाहेर जाऊन येतो असे सांगून निघाला.मात्र त्यांने रेल्वे पुलाखाली गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली.या घटनेची माहिती मिळताच गोंदिया लोहमार्ग पोलीसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविला.
तर दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या घटनेत दवनीवाडा येथील बाजार आटोपून येणार्या काहीजणांना खळबंदा तलावाच्या कालव्यात चालू टार्च तरगंत असताना दिसून आल्याने पोलीसांना माहिती दिली.पोलीसांनी लगेच धाव घेत कालव्यात शोधमोहीम राबविली.गोताखोरांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु केल्यानंतर रात्री 2 वाजेच्या सुमारास झालूटोला निवासी अशोक कटरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.कटरे हे सायकलने येत असताना त्यांचा एका हातात टार्च होती.कालव्याजवळ आल्यानंतर त्यांचा तोल सुटल्याने ते कालव्याच्या पाण्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.