शिक्षक समितीने नोंदविला शासनाचा निषेध

0
15

सडक अर्जुनी,दि.२५ः-गेल्यावर्षी शासनाने १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या.त्यानुसार यावर्षीपासून २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनीच्यावतीने काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
सदर शाळा बंद केल्यास बरेच शिक्षक अतिरिक्त होतील व गोरगरीब विद्याथ्र्यांची पिळवणूक होणार असल्याने या निर्णयाचा विरोध शिक्षक समितीच्या पदाधिकाèयांनी शेंडा चौकात एकत्र येत काळी फीत लावून विरोध दर्शविला.यावेळी किशोर डोंगरवार राज्य कार्यकारिणी सदस्य, पी एन बडोले अध्यक्ष, वीरेंद्र वालोदे सरचिटणीस, जी आर गायकवाड , एम पी वाघाडे, नरेश मेश्राम, हेंमंत मडावी, एच.एन.परशुरामकर, जी.जे.कापगते,चोपराम गोबाडे,जे.बी.कèहाडे,ए.आर.खोटेले,भुमेश बडोले,डी.पी.पर्वते,पी.सी.चचाणे,अरविंद कापगते,मुन्ना गिर्हेपुंजे,राजू कोटांगळे,ए.जी.पाटील,डी.एस.राऊत,यु.एम.लोथे,एन.ए.बडोले,विनोद गहाणे,एन.एस.कोरे व मंजुश्री लढी उपस्थित होते.