वाशिम केंद्रीय विद्यालयातील इयत्ता १ ते ५ वी प्रवेशासाठी अर्ज मागविले

0
8

वाशिम, दि. २५ : वाशिम जिल्ह्यात नव्याने सुरु होत असलेल्या केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील प्रवेशासाठी ६ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज वितरण व अर्ज पूर्णपणे भरून देण्याचा कालावधी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर असा आहे. भरलेले परिपूर्ण अर्ज ६ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत स्वीकारण्यात येतील. प्रवेशास पात्र असलेल्यांची यादी १० ऑक्टोंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता विद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येईल. प्रवेशास पात्र ठरलेल्यांची प्रवेश प्रक्रिया ११ ते १७ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत होईल.

प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय विद्यालयाच्या सन २०१८-१९ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार होईल. प्रवेशासाठी आलेले अपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. प्रवेशासाठी पालकांनी अर्ज कसा भरावा, याबाबतचे मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत सकाळी ८ ते दुपारी २ वाजता दरम्यान केंद्रीय विद्यालय वाशिम, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट), रिसोड रोड, वाशिम येथे करण्यात येईल, असे वाशिम येथील केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य रणजीत कोंढारे यांनी कळविले आहे.