नाराज राणे उपस्थित राहणार?

0
8

वृत्तसंस्था
मुंबई-काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सोमवारी ९ मार्चला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारणार आहेत. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनाही यावेळी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे राणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दादर येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातील टिळक भवनात दुपारी ३ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपादीच सूत्र हाती घेतील. या कार्यक्रमाला पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मावळते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक, गुरूदास कामत, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बालाराम बच्चन, श्योराज जीवन वाल्मिकी हे नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, असं पत्रक काँग्रेसने प्रसिद्ध केलं आहे.