ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे डाॅ.आत्मप्रकाशांची रुची एग्रोच्या यौगिक शेतीला भेट

0
42

गोंदिया,दि.२७ः-जिल्ह्यात शेतीच्या क्षेत्रात क्रांती करुन जैविक शेतीसह यौगिक शेतीला प्राधान्य देत परिसरातील शेतकर्यानाही यौगिक शेती व जैविक शेतीवर भर देण्यासाठी प्रोत्साहित करणार्या रुची एग्रोच्या रायपूर येथील यौगिक व जैविक शेती फार्मला डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १९७३ च्या तुकडीतील एमएस्सी कृषी(माती) अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावणारे आणि माऊंट आबू येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या यौगिक शेती विषयाचे मार्गदर्शक प्रा.डॉ.बी.के.आत्मप्रकाश यांनी आज (दि.२७)भेट देऊन पाहणी केली. शेतीमध्ये अत्याधुनिक साहित्यांचा वापर करुन उत्पादन कसे घेतले जाते त्याची पाहणी केली.सोबतच विदर्भातील पहिल्या ड्रगनफूड शेतीची पाहणी करीत लागलेल्या फळ व फुलांचे अवलोकन त्यांनी केले.यावेळी रुची एग्रो फार्मचे संचालक भालचंद्र ठाकूर,महेंद्र ठाकूर यांनी सविस्तर अशी माहिती त्यांना दिली.यौगिक शेतीच्या लाभाबद्दल माहिती देतांना सांगितले की फळ व भाजीपाल्यांच्या झाडांच्या शेजारी ध्यानसाधना(मेडिटेशन)केल्यास व झांडाशी संवाद साधल्यास जैविक खत मिळालेल्या फळभाजिपाल्यांच्या झाडापेंक्षा ज्या झाडांच्या शेजारी ध्यानसाधना केली जाते त्या झाडांमध्ये मोठ्याप्रमाणात बदल बघावयास मिळतो.सोबतच उत्पादनासोबतच चवीतही अधिक लाभ मिळत असल्याचे प्रत्यक्षात अनुभवास आल्याची माहिती दिली.

डाॅ.आत्मप्रकाश यांनी जैविक शेती ज्याप्रमाणात काळाची गरज आहे,त्याचप्रमाणात यौगिक शेतीही काळाची गरज होऊ घातली असून ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आपण आपल्या ज्ञानाचा लाभ इतरांनाही मिळावे यासाठी 88 देशात आपण प्रवास करीत ज्ञान देण्यासोबतच घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.वेगवेगळ्या ठिकाणी येत असलेले चांगले अनुभव आणि ठाकूर बंधुनी केलेले जैविक व यौगिक शेतीच्या क्षेत्रातील योगदान हे महत्वाचे असून सर्वांनी या शेतीकडे वळावे असा सल्ला दिला.डाॅ.आत्मप्रकाश यांनी रायपूर येथील फार्महाऊसमध्ये पपई,डॅ्गनफुड,सिताफळ,अनार आदी फळझाडांची पाहणी केली.तसेच प्रयोगशाळा व पॅकेंजिक सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले.डाॅ.आत्मप्रकाश हे 23 वर्षानंतर गोंदियाला पहिल्यांदा आले असून येथील ब्रम्हकुमार विश्वविद्यालयाच्या केंद्रात त्यांनी गेली दोन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली.तसेच केंद्रातील सर्वांना मार्गदर्शन केले.यावेळी रुची एग्रोचे मार्गदर्शक श्रीराम ठाकूर यांच्यासह रुची एग्रोचे कर्मचारी उपस्थित होते.