जितेंद्र कटरे काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष नियुक्त

0
6

गोरेगाव,दि.27ः- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या निर्देशावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशअध्यक्ष प्रमोद मोरे यांनी गोरेगाव तालुक्यातील चिचगाव निवासी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व बाजार समितीचे संचालक जितेंद्र कटरे यांची गोंदिया जिल्हा काँग्रेस ओबीसी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.कटरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माजी खासदार व खेत मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले,आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हा महासचिव अमर वराडे यांना दिले आहे.