वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे पसरविणार्‍या सहा आरोपींना अटक

0
20

गडचिरोली,दि.28ः-वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जाळे फसरविणार्‍या सहा आरोपींना कोनसरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी अटक केल्याची घटना  कोनसरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या कक्ष क्रमांक १९३ मध्ये घडली.
आशुतोष जतीन बिश्‍वास रा. गौरीपूर, अजित कृष्ण बाला. रा. बहाद्दूरपूर, शंकर सुकरण घरामी रा. क्रिष्णराजपूर, नाशिकांत नीताई हलदार रा. विष्णूपूर, विश्‍वजीत कृष्ण बाला रा. बहाद्दूरपूर, सुखदेव हरूलाल सुतार रा. गौरीपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुनील रॉय हा फार असल्याची माहिती वनपाल बी. बी. भोसले यांनी दिली.
कोनसरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्र. १९३ मध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी जाळे पसरविण्यात येत असल्याची गुप्त माहिती कोनसरी येथील वनाधिकार्‍यांना मिळाली मिळाली. या माहितीच्या आधारे वनाधिकारी व कर्मचार्‍यांनी काल रात्री ३ वाजताच्या सुमारास जंगलात जाऊन पाहणी केली असता सात आरोपी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जाळे परविताना आढळून आले. वनकर्मचार्‍यांनी सहा आरोपींना अटक केली व एक आरोपी फरार झाला. घटनास्थळावरून तार, चाकू, केन, दोरी, नायलॉन, वाईडींग तार व दोन मोटार सायकली जप्त केल्या.
सदर कारवाई आरएफओ एम. जी. करडभूसे, एम.एन. गंधलवार, बि. बि. भोसले, पुष्पा मडावी, डी. एम. मुरसेन, वनमजूर जी.प. शेंडे, ही. एम. नेवार, टी. एम. कुमरे, व्ही. के. चंद्रगिरीवार यांनी केली.