मुख्याध्यापक संघाची निवडणुक 27 आक्टोंबरला

0
12

गोदिंया दि. २८ ::-गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या तीन वर्षिय कार्यकाळासाठी संघाच्या वतिने फुंडे विज्ञान क.महा.फुलचुर येथे जिल्हा कार्यकारीणी व आंमत्रितांच्या सहविचार सभेत आयोजित गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची निवडणूक 27 आक्टोबंर रोजी घेण्याचे ठरविण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य रामसागर धावडे होते.या प्रसंगी मंचावर प्राचार्या कु. रजीया बेग,सर्व मुख्याध्यापक प्रदिप नागदेवे,सौ.एम.टी.हुमे,प्राचार्य खुशाल कटरे,प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे उपस्थित होते.
संचालन संघाचे कार्यवाह खुशाल कटरे यांनी केले.प्रारंभी आमगांव व सालेकसा तालुका मुख्याध्यापक संघाचे नवनियुक्त अध्यक्ष प्राचार्य देवेंद्र मच्छिरके ,सचिव प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे,गोरेगांव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे,अर्जुनी/मोर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव घनश्याम गहाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सभेत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नविन कार्यकारीणी निवडीकरीता 27 आक्टोंबरला शनिवारी दु.12 वाजता कृषक विद्या मंदिर कोहमारा येथे सभा घेण्याचे सर्वसम्मंतीने ठरविण्यात आले.सभेत शैक्षणीक समस्या स्विकारण्यात आल्यात.सभेला डी.एस.हुकरे,जी.एम.येळे,यु.जी.चौव्हाण,मनोज भुरे,बी.पी.त्रिपाठी,आर.टी.नाकाडे,श्रीमती बी.आर.भारद्वाज,डी.एस.मुरकुटे,दिलीप चाटोरे,श्रीमती अजया चुटे,महेन्द्र मेश्राम,राजकुमार हेडाऊ,एम.के.बिसेन,जे.बी.कटरे,अरुण पालांदुरकर,प.का.राऊत,डी.एव.मेश्राम,आर.आर.परशुरामकर,बी.जी.बिसेन,पी.एस.चौरागडे,पी.डी.गणवीर,एन.जी.भरणे,ओ.बी.शेन्डे, एम.एस.शेख,उपस्थित होते.