२४ तास उलटले पोलिसांना १० लाखाच्या चोरीचा माग सापडेना

0
5

अहमदपूर,दि.29ःः भरदिवसा घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी फुले शाळे च्या मागील बाजूस असलेल्या साईनाथ गादेवार यांच्या घरी धाडसी चोरी केली घटनेला २४तास उलटूनही पोलिसांनी कोणताही माग सापडला नाही.दरम्यान या चोरी मुळे संपूर्ण अहमदपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यवाही कडे लक्ष लागले आहे.
दि.२७ च्या दुपारी ५ ते रात्री ८ या दरम्यान ही चोरी झाली रात्री ८:३० वा हा प्रकार लक्षात आला घर मालक खरेदीच्या निमित्त लातूर ला तर पत्नी नेहमी प्रमाणे दुकानावर गेल्या होत्या या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी वेळ हेरली घटना स्थळी पोलीस उप विभागाचे अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण  लातूरचे पोलीस निरीक्षक श्र्वान पथक, ठसे तज्ञ, भेट देऊन गेले.सदर चोरीचा तपास लवकर लागावा या साठी पवन गादेवार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर व्यापारी अदोलन छेडण्याचा तयारीत आहेत.पोलीस निरीक्षक जाधव नव्याने रुजू झाले असून त्यांच्या पुढे हे मोठे आव्हान उभे राहिले आहे.या चोरीची माहिती समजताच आर्य वैश्य महासभेचे अ भा अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी घटना स्थळी भेट दिली.समाजाचे अनेक बांधव पण भेट देत असून लवकर तपास लागावा या साठी समाजातून मागणी होत आहे. प्रकरणी भादवी ३८०नुसार गुन्हा नोंद झाला असून दहा लक्ष रुपया पेक्षा जास्त ऐवज चोरी गेल्याचे कळते.