स्लॅब कोसळून नगरसेवक जखमी

0
11

साकोली,दि.01ः-येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या ओपीडी समोरील जीर्ण भाग कोसळून दर रविवारी राबविण्यात येणार्‍या स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वच्छता करणारे नगरसेवक जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.३0) घडली. रूग्णालयातील बहुतांश जीर्ण भाग, निवासस्थान पाडून नुतनीकरण करण्यात यावे, यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेर्शाम व नगरसेवक अँड. कापगते यांनी शासनासह नगरपरिषदेकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली नसल्याने येथे रूग्ण व नातेवाईंकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालेला आहे.
रविवारी उपजिल्हा रूग्णालयात बजरंगदल, विहिंप कार्यकर्त्यांचा ३१ व्या स्वच्छता सप्ताहानिमित्त ओपीडी समोरील आवारात स्वच्छता करीत असतांनी जिर्ण स्लॅब अचानक कोसळला. यावेळी अँड. कापगते यांना दुखापत झाली. दरम्यान डॉ.चंद्रशेखर मेर्शाम तत्काळ त्यांच्यावर उपचार केले. सदर इमारतीचे उद््घाटन दि. २१ फेब्रुवारी १९८१ ला आरोग्य राज्यमंत्री ना. सतिश चतुर्वेदी, भंडारा पालकमंत्री ना. हरिभाऊ नाईक व दिवंगत आमदार जयंत कटकवार यांच्या उपस्थितीत ३७ वर्षापूर्वी झाले होते. गेट क्र.२ बाजूला अधिक्षक निवासस्थान हे अत्यंत जीर्ण व पडक्या स्थितीत आहे. सदर इमारत जमिनदोस्त करून येथे नविनीकरणाचा प्रस्ताव वैद्यकिय अधिक्षक डॉ. चंद्रशेखर मेर्शाम यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांना वारंवार पत्र देऊन सादर केले. तसेच नगरसेवक कापगते यांनीही आरोग्य विभाग, नगरपरिषदेकडे याबाबद पाठपूरावा करूनही कुठलीही दखल घेतलेली नाही. याच सामाजिक युवा कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रूग्णालयात स्वच्छता करून ३0 सप्ताहात रूग्णालयाचा कायापालट केला हे विशेष.
रूग्णालयाच्या जीर्ण अवस्थेमुळे रुग्ण व नातेवाईकांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून इमारती नुतनीकरण करून पार्कींग, रूग्णनातेवाईकांना विर्शाम करण्यासाठी, स्वयंपाकीसाठी धर्मशाळा निर्माण करून जिल्ह्यातील दूसर्‍या क्रमांकाचे असणारे उपजिल्हा रूग्णालयात नविनीकरणाची भर घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वैद्यकीय अधिक्षकांसोबत चर्चा करतांना बजरंगदल तालुका संयोजक गोलू धुर्वे, नगरसेवक मनिष कापगते, विहिंपचे घनश्याम आगाशे, रूषभ तांडे, सोनू भुरे, छत्रुघ्न पटले, डॉ. उषा डोंगरवार, होमेश गहाणे, आशिष काशीवार, किशोर बावणे, बालू शहारे, तुकाराम डावखरे, दिपक रहांगडाले, अभिषेक धांडे, महेश वाघदेवे व इतर युवा सामाजिक स्वयंसेवक उपस्थित होते