ओबीसींनी अन्यायाविरुद्ध पेटून उठावे-माऴी

0
11

आष्टी,दि.01ः- ओबीसी समाजावर होत असल्यालेल्या अन्यायाविरुद्ध समाज पेटून उठावे, असे प्रतिपादन इंजिनिअर अरविंद माळी यांनी केले.स्थानिक महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा आष्टीच्यावतीने ओबीसी समाज कार्यकर्ताप्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. उद््घाटन जि.प. सदस्या रूपाली पंदिलवार यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंचा वर्षाताई देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दिनकर हिरादेवे उपस्थित होते.
७ ऑगस्ट १९९0 ला मंडल आयोग लागू होऊन २८ वष्रे पूर्ण झाली. हा आयोग ओबीसी समाजासाठी पूर्णपणे लागू करून त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे या अन्यायाविरूध्द ओबीसी समाज एकत्र करून त्यांना योग्य मार्गदर्शनातून त्यांच्या खर्‍या समस्यांची जाणीव करून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यासाठी आज ओबीसी समाज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक एन. एस. बोरकुटे, संचालन प्रा. इंगोले यांनी केले. कार्यशाळेला महिला, पुरूष व समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.