गांधी जंयतीनिमित्त जि.प.मध्ये स्वच्छता अभियान

0
16
गोंदिया,दि.२ : स्थानिक जिल्हा परिषद परिषद प्रशासकीय ईमारत येथे आज (दि. २)राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या छायाचित्राला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई मडावी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंत मडावी,जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ शाम निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक,कार्यकारी अभियंता वैरागकर, कार्यकारी अभियंता विश्वकर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान जिल्हा परिषदेतील अधिकारी/कर्मचारी यांनी यावेळी श्रमदानातून परिसर स्वच्छ केला.