विदर्भ राज्यासाठी आत्मक्लेश आंदोलन

0
15
गोंदिया,दि.०२ : २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विदर्भ वेगळा झाला पाहिजे, याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने मंगळवारी (दि. २) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या आंदोलनात शेकडो विदर्भवादी सहभागी झाले होते.राज्यावर सध्या ४ लाख ६३ हजार कोटी रुपये कर्ज आहे. देशात सर्वांत मोठे कर्जबाजारी हे राज्य आहे. त्यामुळेच नवीन नोकर भरती बंद आहे. आता महाराष्ट्रात विदर्भातील तरुणांना नोकèया मिळणार नाहीत. भारनियमन संपणार नाही. विजेचे दर दुप्पट होतील. म्हणून महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास अशक्य आहे. विदर्भ वेगळा झाला तर, ११ जिल्ह्याचे ३० जिल्हे आणि ३०० तालुके होतील. लाखो नोकèया तयार होतील. विदर्भातीलच बेरोजगारांना नोकèया मिळतील. शेतीचे qसचन वाढेल. गावागावांत रस्ते होतील, म्हणून विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे, अशी भूमिका आपली असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्पष्ट केले.जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. टी. बी. कटरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात,एड अर्चना नंदघळे, गुरमीत चावला उमेद्र भेलावे,मुकुंद धुर्वे, अशोक पडोळे, विनोद जैन यांच्यासह शेकडो विदर्भवादी सहभागी झाले होते. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भेट देऊन समर्थन जाहिर केले.
तिरोड्यातही आंदोलन
विदर्भ आंदोलन समितीच्या जिल्हा महिला आघाडीअध्यक्ष अ‍ॅड. माधुरी रहांगडाले, तालुकाध्यक्ष भुमेश्वर पारधी, शहराध्यक्ष बाबूराव डोमळे, राजकुमार बोपचे, डी. आर. गिèहेपुंजे, जगन्नाथ पारधी, सुनील बारापात्रे, रामकृष्ण आगासे, भोजराज तुरकर, राजेश तायवाडे, कमल कापसे, भरत बिसेन उपस्थित होते. या वेळी तहसीलदार संजय रामटेके यांना निवेदन देण्यात आले.