अंहिसा मॅराथॉन स्पर्धेत धावले ७ हजार ६०० स्पर्धेक

0
13
सौरभ,वैशाली,हॉप मॅराथॉनमध्ये गुरुदेव व वर्षा तर फुल मॅराथॉनमध्ये महेश व वैशाली प्रथम
गोंदिया,दि.0२- गांधी जयंतीनिमित्त आज २ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस विभागातर्फे अहिंसा मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते.या मॅराथॉनमध्ये ७ हजार 6०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.या मॅराथॉनच्या २१ किलोमीटर स्पर्धेत मुरपार येथील गुरुदेव दमाहे या युवकाने प्रथम क्रमांक पटकावला.पोलीस मुख्यालय येथे आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.बक्षिस वितरण सोहळ्याला पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे,आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी,नगराध्यक्ष अशोक इंगळे, पोलीस अधिक्षक हरिष बैजल,अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप आटोळे,मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी,विनोद अग्रवाल,महेंद्र ठाकूर,श्रीमती छाया बैजल,मुन्नालाल यादव यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.फुल मॅराथॉन स्पर्धेच्या विजेत्याला कामधेनू होंडा शोरुमच्यावतीने होंडा क्लिक मोटारसायकल देण्यात आली.सर्व विजेत्यांना रोख रक्कम,पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेचे संचालन श्रीमती देशपांडे यांनी केले तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी मानले.
जिल्हा पोलिस दलातर्फे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त १६ वर्षावरील वयोगटातील महिला-पुरुषांसाठी अहिंसा मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.६ कि.मी. स्पर्धेत स्वत आमदार फुके हे सहभागी झाले होते.या स्पर्धेत ५ हजार २४७ स्पर्धेक सहभागी झाले होते.हॉप मॅराथॉनमध्ये २६८ व फुल मॅराथॉनमध्ये २०५ असे ७६२० स्पर्धकांनी भाग घेतला. ६ किमीमध्ये पुरुष गटात सौरभ धनवंत बघेले,महिला गटात वैशाली रहागंडाले प्रथम,राजेश पुरुषोतम चौधरी व सुषमा रहागंडाले द्वितीय,विशाल धुरनलाल लिल्हारे व पदमा पाचे तृतीय,विकास बावनकर व तनुजा वाढवे चतुर्थ,करण संतोष खरे व हसिता वाळवे यांनी पाचवा क्रमांक,राजेंद्र गोत्रे व आशा शहारे सहावा क्रमांक,महेंद्र मुरकुटे व गायत्री मौजे सातवा क्रमांक पटकावला.
हॉफ मॅराथानमध्ये प्रथम क्रमांक गुरुदेव दमाहे व  वर्षा पंधरे,द्वितीय रामेश्वर पटले,रामकला शेंडे,तृतीय ब्रम्हनंदा बसेना व तेजस्विनी लाबंकाने,चतुर्थ क्रमांक विद्ममान तुमडाम,माधुरी बावनकर,पाचवा क्रमांक निकेश सियारे व स्वाती पाचे,सहावा क्रमांक दिनेश मलखाम संतोषी लिल्हारे,सातवा क्रमांक मिनेश पाचे व महिला गटात मनिषा बिरनवार ने पुरस्कार पटकावला.
फुल मॅराथॉनमध्ये प्रथम क्रमांक महेश वाढई व वैशाली मते,द्वितीय क्रमांक सुभाष लिल्हारे व उषा वलथरे,तृतीय दिनेश दसरे व सविता लिल्हारे,चतुर्थ क्रमांक राहुल मेश्राम व शितल पारधी,पाचवा क्रमांक महेंद्र कतलाम व शिल्पा वडे,सहावा क्रमांक सावन साखरे व शिल्पा भिमटे,सातवा क्रमांक आकाश मोहुर्ले व रिना मडावी यांनी पुरस्कार पटकावले. हे सर्व विजयी स्पर्धेक मुंबई येथे आयोजित मॅराथाॅन स्पर्धेत जिल्हाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.