न्यायालयात हत्या प्रकरणातील आरोपीने पोलिस कर्मचार्‍याला बदडले

0
9

गोंदिया,दि.03ः-जिल्हा न्यायालयात पेशी तारखेवर आलेल्या भंडारा कारागृहात हत्याप्रकरणी बंदी असलेल्या २५ वर्षीय आरोपीने कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यासोबत वाद घालून मारहाण केल्याची घटना २९ सप्टेंबरच्या दुपारी घडली.घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर ठाण्याचे पोलिस निरिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली.
शहरातील गौतमनगर बाजपेईवार्ड परिसरात झालेल्या युवकाच्या हत्याप्रकरणी येथील विशाल लांजेवार (२५) व अमोल उके या दोघांना अटक करून त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी पेशी तारखेवर जिल्हा न्यायालयातील सेशन कोर्ट येथे हजर करण्यात आले. पेशी झाल्यानंतर वर्‍हांड्यात बसवले असता आरोपीने गोंदिया पोलीस मुख्यालय येथे कार्यरत फियार्दी पोलीस शिपाई नरेंद्र लेखराज फुलबांधे (३८) रा. अजुर्नी मोरगाव याला हातकडीं खोल मला नातेवाईकांशी बोलायचे आहे असे म्हटले असता फिर्यादी पोलीसांनी नकार दिला.त्यावर आरोपींनी पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करून कॉलर पकडून मारहाण केली.तसेच पुढे पाहून घेण्याची धमकी दिली. फियार्दीच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक नार्वेकर करीत आहेत.