गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत एकबुर्जी धरण येथे जलपूजन

0
31

वाशिम, दि. ०३ :  गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम संस्था व लोकसहभागातून गाळ उपसा करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत आज निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते व वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्या प्रमुख उपस्थितीत एकबुर्जी धरणात जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार बळवंत अरखराव, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, पाटबंधारे विभागाचे श्री. सोनोने, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती करुणा कल्ले, सरपंच प्रल्हाद गोरे, सुभाष नानवटे, मनीष मंत्री, अनुलोमचे उपविभाग प्रमुख आशिष भागडकर, भिकाजी ढगे, किरण जवळे, राजाभाऊ इंगळे, दिलीप काळे, राजेश भोयर, अंबादास कालापाड आदी उपस्थित होते.केकतउमरा, धानोरा, वाळकी, एकबुर्जी व वाशिमसह इतर आजूबाजूच्या गावांमधील शेतकरी, नागरिकांचा व अनुलोम संस्थेच्या सहभागातून मे व जून महिन्यात एकबुर्जी धरणातील गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ होण्यास मदत झाली आहे.