प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे खासदार गवळी यांच्या हस्ते उद्घाटन

0
11

वाशिम, दि. ०३ :  युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी किमान कौशल्यावर आधारित प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत वाशिम येथे सुरु झालेल्या प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन दि. १ ऑक्टोंबर रोजी खासदार भावना गवळी यांच्या हस्ते झाले. दिल्लीस्थित एम्पॉवर प्रगती व्होकेशनल अँड स्टेफिंग प्रा. लि. या राष्ट्रीय कौशल्य विकास समितीच्या व मिनिस्ट्री ऑफ स्कील डेव्हलपमेंट अँड इंटरप्रेनिअरशिप यांच्या भागीदार असलेल्या संस्थेने हे केंद्र विकसित केले आहे.

केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, एम्पॉवर प्रगती व्होकेशनल अँड स्टेफिंग प्रा. लि.चे संचालक के. बी. राजेन्द्रन, प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक विशेष सैनी, सावन राजूरकर, नितीन मलिक, सुरेश मापारी यांची उपस्थिती होती.यावेळी खासदार गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.